Menu

नाशिक : तोंडाला मास्क न लावल्याने राज्यात पहिला गुन्हा दाखल

कोरोनाचे सावट साऱ्या देशावर घोंघावत आहे. दिवसागणिक कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भर पडताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यासाठी जोमाने कामाला लागले आहेत. लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. सोशल डिस्टंसिंगचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही अनेकजण या नियमांना बगल देत असल्याचे समोर आले आहे. नाशिक पोलिसांनी अशांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मास्क न वापरल्याने या ठिकाणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पोलीस स्टेशन परिसरात हा प्रकार समोर आलाय. निफाड तालुक्यातील डोंगरगावचे पांडुरंग दत्तू आव्हाड या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतरांना त्रास होईल असे कृत्य केल्याने आयपीसी 188 कलमा अंतर्गत ही कारवाई होणार आहे.
%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95-%e0%a4%a8-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5

^