Menu

दिल्ली : तबलिगी जमातच्या लोकांनी माफी मागावी; काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांची मागणी

तबलीगी जमातच्या घटनेवर काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी कडक आणि परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. या घटनेवर तबलिगी जमातीच्या लोकांनी माफी मागावी, असं आवाहन दलवाई यांनी केलंय. सरकारच्याही अनेक चुका झाल्या, पण सरकारवर टीका करण्याची ही वेळ नाही. पहिली लढाई कोरोनाशी आहे. विदेशातून आलेले लोक कसे काय फिरत होते. या गोष्टीचे समर्थन कुठल्याही पद्धतीने होऊ शकत नसल्याचे ते म्हणाले. मरकजमध्ये मार्च महिन्यात एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तोच कार्यक्रम देशात कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा प्रमुख स्रोत बनल्याचे बोलले जात आहे. COVID-19 च्या पार्श्वभूमीवर निजामुद्दीच्या मरकजमध्ये सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु, या आदेशाचं उल्लंघन करत कार्यक्रमाचं आयोजन झालं.
%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%ac%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%97%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b2

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये अशी सूचना देण्यात आली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, जेणेकरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर खबरदारी म्हणून धार्मिक स्थळं बंद करण्यात आली आहेत. तरीही या कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि त्यामधून कोरोनाचा संसर्गही झाला. दिल्लीतील मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावरुन मौलाना मोहम्मद साद कांधलवी आणि तब्लिगी जमातच्या इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामारी कायदा 1897 आणि भारतीय दंड विधानांच्या कलमांनुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे.

^