Menu

मुंबई : सोनूला ‘पद्मविभूषण’ देवून सन्मानित करा; चाहत्यांची मागणी

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. हाती काम नसल्यामुळे या मजुरांनी आपल्या राज्यात परतण्याचा निर्णय घेतल. सुरवातीला हे मजूर कामगार पायी, सायकलीवर आपल्या गावी पोहोचले. या दरम्यान अनेक मजुरांचा मृत्यू देखील झाला. त्यामुळे कामगारांसाठी रेल्वे मंत्रालयानं त्यांना आपल्या राज्यात पोहोचवण्यासाठी श्रमिक रेल्वेची सुरूवात केली. त्याप्रमाने सोनुचे देखील या कामात मोठे योगदान लाभले आहे. चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू श्रमिकांसाठी मात्र हिरो ठरला आहे. त्यामुळे आता सोनू सुदला 'पद्म विभूषण' पुरस्कार देवून सन्मानित करावं अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे. एका युझरने ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत सोनूला 'पद्म विभूषण' पुरस्कार देवून सन्मानित करण्याची मागणी केली आहे.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%b7%e0%a4%a3

^