Menu

मुंबई : श्रमिकांची भूक भागवण्यासाठी महानायकाचा पुढाकार

कोरोना व्हायरस या महामारीसोबत दोन हात करण्यासाठी बॉलिवूडकर गरजुंची मदत करताना दिसत आहेत. नुकताच बॉलिवूडचे  महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या कठिण समयी गरजुंची मदत करण्याच्या दृष्टीने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. बिग बींच्या वतीने  एबी कॉर्प लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव गरजूंना मदत करत आहेत. त्याप्रमाणे त्यांनी हाजी आली ट्रस्ट आणि पीर मखदूम साहेब ट्रस्टच्या मदतीने दररोज शिजवलेल्या अन्नाच्या पॅकेटचे वाटप देखील सुरू केले आहे.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%95-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97

अमिताभ बच्चन यांच्या संबंधित एका सूत्राने याबद्दल पुणे मिररला सांगितले की, हाजी आली ट्रस्ट आणि पीर मखदूम साहेब ट्रस्टच्या मदतीने बिग बींनी दररोज शिजवलेल्या पॅकेटचे वाटप देखील सुरू केले आहे. दररोज तब्बल ४ हजार ५०० शिजवलेल्या अन्नाचे पॅकेट वाटले जात आहेत.  बच्चन यांनी २८ मार्च पासूनच अरब गली, अंटोप हिल, वर्ली लोटस, माहिम दर्गा , हाजी अली दर्गा, धारावी आणि सियोन मुंबईच्या या ठिकाणी अन्नाचे वाटप करण्यास सुरूवात केली. शिवाय त्यांनी आतापर्यंत १० हजार रेशन पॅकेट आणि हॉस्पिटल आणि मुंबई पोलिसांमध्ये २० पीपीई किट, मास्कचे वाटप केले आहे. मीडिया रिपेर्टच्या सांगण्यानुसार, बिग बींनी मजुरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रचंड मदत केली आहे. त्यांच्या टीमने पायी आपल्या राज्यात जाणाऱ्या मजुरांना पाण्याच्या बाटल्या, अन्न, चपलांचे वाटप केले आहे. त्यांनी मजुरांना गावी पोहोचवण्यासाठी देखील प्रचंड मदत केली आहे. बिग बींशिवाय अभिनेता सोनू सुदचं या कामात मोलाचं योगदान आहे.  चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू श्रमिकांसाठी मात्र हिरो ठरला आहे.

^