Menu

पुणे : मान्सूनचा पाऊस ८ जूनपर्यंत राज्यात दाखल होणार

उन्हाच्या वाढत्या झळांमुळे त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील लोकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, मान्सूनचा पाऊस ८ जूनपर्यंत राज्यात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने IMD वर्तवला आहे. त्यापूर्वी ३० मेपासून राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसायला सुरुवात होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्यातील शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिली. त्यामुळे प्रचंड उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याने गुरुवारीच मान्सून १ जूनला केरळात दाखल होईल, असे म्हटले होते. अरबी समुद्रात मान्सूनच्या आगमनासाठी पोषक असणारा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मान्सूनची पुढची वाटचाल विनासायास होईल, असे IMD ने म्हटले होते.
%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%b8-%e0%a5%ae-%e0%a4%9c%e0%a5%82%e0%a4%a8

^