Menu

दिल्ली : दरवर्षी पृथ्वीवर पडतात १७ हजार उल्का

दरवर्षी पृथ्वीवर 17 हजारांहून अधिक उल्का पडतात. यापैकी बहुधा उल्का विषुववृत्ताजवळील प्रदेशात पडतात. जेव्हा अंटार्क्टिकामध्ये एका संशोधनासाठी गेले होते तेव्हा एका वैज्ञानिकांनी याबाबत खुलासा केला होता. स्नोमोबाईलवर अंटार्क्टिकामध्ये फिरत असताना एका उल्काचा तुकडा त्यांना तेथे मिळाला होता.
%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%83%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%b0

इंग्लंडच्या मॅनचेस्टर युनिव्हर्सिटीमध्ये जियोफ्री ईवाट एक मॅथमेटेशियन आहेत. अंटार्क्टिकाचा प्रवास केल्यानंतर, ते आणि त्यांच्या सहकार्यांनी दरवर्षी पृथ्वीवर किती उल्का पडतात आणि बहुतेक उल्का कोठे पडतात याचा शोध सुरु केला. जियोफ्री म्हणतात की, एप्रिल 1988 ते मार्च 2020 पर्यंत पृथ्वीवर किती आणि कुठे उल्का पडला याची नोंद आहे. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅलटेक) आणि नासा यांनी तयार केलेल्या नकाशात पृथ्वीवर सर्वात जास्त उल्का कुठे पडतात हे दाखवण्यात आलं आहे.

या संशोधकांनी पृथ्वीवरील काही भाग निवडले आणि त्यानंतर दोन वर्षे अभ्यास केला. उन्हाळा हा अभ्यासासाठी सर्वात योग्य वेळ होता. म्हणूनच, उन्हाळ्याच्या हंगामात, ते पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात पडणार्‍या उल्कांचा अभ्यास करत होते. यावर्षी २९ एप्रिल रोजी जियोफ्री ईवाट यांनी भूविज्ञान मासिकात हा अहवाल प्रकाशित केला. त्यात त्यांनी म्हटलं की, दरवर्षी पृथ्वीवर 17 हजारांहून अधिक उल्का पडतात. बहुतेक उल्का विषुववृत्ताच्या समीप प्रदेशांवर पडतात. जियोफ्री ईवाट म्हणतात की, ‘जर तुम्हाला खरोखरच उल्कामधून आलेले फायरबॉल्स पहायचे असतील तर तुम्हाला विषुववृत्ताच्या सभोवतालच्या भागात जाऊन रात्र काढावी लागेल.’

^