Menu

दिल्ली : देशात गेल्या २४ तासात ७९६४ जणांना कोरोनाची लागण

देशात सतत कोरोना  रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ७ हजार ९६४ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. शिवाय या धोकादायक विषाणूने २६५ रुग्णांचा बळी घेतला आहे. देशात कोरोना रुग्णांची आकडेवारी आता १ लाख ७३ हजार ७६३वर पोहोचली आहे. त्यापैकी ८६ हजार ४२२ रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून आतापर्यंत देशात ४ हजार ९७१ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ८२  हजार ३७० रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून  सुखरूप बाहेर पडल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a5%a8%e0%a5%aa-%e0%a4%a4%e0%a4%be

लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मात्र झपाट्याने वाढताना दिसत आहे. शुक्रवारी देशातील मृतांची संख्या ४ हजार ७०६ ऐवढी होती. आज ती संख्या ४ हजार ९७१ पोहोचली आहे.  त्यामुळे मृतांच्या आकडेवारीत भारताने आता चीनला मागे टाकले असल्याचं  चित्र स्पष्ट होत आहे.

^