Menu

मुंबई : चातुर्मास पर्वासाठी जैन साधु-साध्वींना पायी प्रवास व स्थलांतर करण्याची परवानगी

जैन समाजाच्या चातुर्मास पर्वाला 18 जून पासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. त्यानुसार चातुर्मास पर्वासाठी जैन साधु-साध्वींना पायी प्रवास व स्थलांतर करता येईल. चातुर्मासाचा हा कार्यकाळ जैन श्रावक श्राविकांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. या काळात जैन साधू व साध्वी महाराष्ट्र व कर्नाटक मधील काही भागांमध्ये निश्चित केलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पायी जातात. या साधू आणि साध्वींसोबत मोजका सेवकवर्ग ही असतो. मात्र, कोरोनामुळे यंदा त्यांना पायी चालत जाण्यास परवानगी मिळणार की नाही, हा प्रश्न उपस्थित झाला होता. लॉकडाऊनमुळे त्यांच्या प्रवासात अडथळे येण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर जैन श्रावीकांच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन साधूंना प्रवासाची परवानगी मिळावी, अशी विनंती केली होती.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be

^