Menu

मुंबई : खासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी

शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर, मनोरुग्ण तसेच अनाथांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. अक्षयने फेसबुक लाईव्हद्वारे माहिती देताना जुन्नरच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यावर यासंदर्भात आरोप केले आहेत. या लाईव्हमध्ये त्याच्यासोबत नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. या घटनेचा खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र निषेध केला आहे.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a5%8b-2

कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलीस प्रशासनाने याप्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि गुन्हा दाखल करुन या तरुणाला न्याय मिळवून द्यावा, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा घेऊन असंख्य बेघर, मनोरुग्ण, अनाथ लोकांचे मनोभावे संगोपन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वताचे आयुष्य वाहून घेणारा जुन्नर तालुक्यातील शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आधार देणारा युवक अक्षय बोऱ्हाडे याला काही राजकीय लोकांकडून बंदुकीचा धाक दाखवून अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय आहे, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

^