Menu

मुंबई : सुशांत सिंह राजपूतप्रकरणी सलमानची पाठराखण करणं अभिनेत्याला पडलं महागात

रुपेरी पडद्यावर क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याची व्यक्तिरेखा मोठ्या ताकदीनं साकारणाऱ्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. एका अनपेक्षित वळणावर येऊन सुशांतनं त्याचं आयुष्य संपवलं. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b9-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%a4-2

सुत्र आणि काही चर्चांवर विश्वास ठेवला तर, मागील सहा महिन्यांपासून सुशांत नैराश्याचा सामना करत होता. त्याच्या नैराश्यासाठी कलाविश्वातील घराणेशाहीच जबाबदार असल्याचं म्हणणारी कलाकारांची एक फळी बॉलिवूडमध्ये सक्रिय झाली आहे. अशा या चर्चांमध्येच अभिनेता सलमान खान यालाही टीकेचं धनी केलं गेलं. यातच आताल सलमानची पाठराखण करण्यासाठी म्हणून पुढे आलेल्या सेलिब्रिटींनाही नेटकरी आणि चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. सलमानचा पाठिंबा देण्यासाठी म्हणून काहींनी त्यांचं ट्विटर अकाऊंट डिलीट केलं. तर, काहींनी ट्विट करत भाईजानची साथ दिल्याचं पाहायला मिळालं. पण, या साऱ्यामध्ये त्यांच्यावरही सडकून टीका झाली. यातीलच एक नाव म्हणजे अभिनेता आणि विनोदवीर सुनील ग्रोवर याचं.

^