Menu

जयपूर : पायलट यांच्या हातात काहीच नाही, सगळी सूत्रे भाजपच्या हातात – गेहलोत

सचिन पायलट यांच्या हातात काहीच नाही. कारण, त्यांची सगळी सूत्रे भाजपच हलवत आहे, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला. काँग्रेसने मंगळवारी सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. यानंतर अशोक गेहलोत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, गेल्या सहा महिन्यांपासून सचिन पायलट आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे वर्तन 'आ बैल मुझे मार' असेच होते. गेल्या काही काळातील त्यांची ट्विटस आणि वक्तव्ये बघता त्याचा प्रत्यय येईल.
%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b2%e0%a4%9f-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be

मी नेहमी सर्व आमदारांना एकसारखी वागणूक दिली. आज आमच्या तीन सहकाऱ्यांवर कारवाई करताना आमच्यापैकी कोणालाही आनंद वाटत नाही. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी अगोदरच भाजपच्या भेटीगाठी घेतल्या होत्या, त्यांच्यात सौदेबाजी झाली होती. त्यामुळे आमचा नाईलाज झाला, असे अशोक गेहलोत यांनी सांगितले.या सगळ्यासाठी भाजप रिसॉर्टपासून अगदी सर्वकाही उपलब्ध करुन देत आहे. मध्य प्रदेशात यासाठी ज्या टीमने काम केले होते तीच टीम आता राजस्थानमध्ये कार्यरत असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला. दरम्यान, काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपद काढून घेतल्यानंतर सचिन पायलट यांनीही आपल्या ट्विटर प्रोफाईलवरुन काँग्रेसचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे आता पायलट भाजपमध्ये प्रवेश करणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. परंतु, भाजपकडून अजूनही सावध भूमिका घेतली जात आहे. राजस्थानातील जनता या सरकारवर प्रक्षुब्ध झाली आहे. त्यामुळे आता जगातील कोणतीही ताकद काँग्रेस सरकारला वाचवू शकत नाही. हे सरकार सत्तेतून जाणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असेल. त्यादृष्टीने आम्ही सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आगामी काळात परिस्थिती पाहून आम्ही रणनिती निश्चित करू, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतिश पुनिया यांनी दिली.

^