Menu

जयपूर : काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर सचिन पायलटांनी उचलले मोठे पाऊल

सचिन पायलट Sachin Pilot यांच्या बंडानंतर राजस्थानमध्ये Rajasthan Crisis सुरु झालेले सत्तानाट्य आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे. काहीवेळापूर्वीच काँग्रेसने सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. पायलट यांच्या जागी गोविंदसिंह डोटासरा यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या कृतीला सचिन पायलट यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. सचिन पायलट यांनी सोशल मीडियावरून आपल्या प्रोफाईलवरुन काँग्रेसचा उल्लेख हटवला आहे. आता यानंतर सचिन पायलट काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कालपर्यंत सचिन पायलट यांच्या निकटवर्तीयांकडून ते भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, असे सांगितले जात होते. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जयपूरमध्ये केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे पायलट यांच्या परतीचे सर्व दोर कापले गेल्याची चर्चा होती. ही शक्यता आज खरी ठरताना दिसत आहे. आता काँग्रेस पायलट यांची पक्षातूनही हकालपट्टी करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसे झाल्यास सचिन पायलट काय करणार, याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%81%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d

^