Menu

मुंबई : दिवसभरात राज्यात ६४९७ नवे कोरोना रुग्ण; तर १९३ जणांचा मृत्यू

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज राज्यात दिवसभरात 6497 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील आतापर्यंतचा कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 60 हजार 924 इतका झाला आहे. सोमवारी राज्यात 193 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात एकूण 10,482 जण दगावले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.02 टक्के इतका आहे. सद्यस्थितीत राज्यात 1 लाख 5 हजार 637 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची दिलासादायक बाब आहे. आज दिवसभरात राज्यात 4182 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत राज्यात एकूण 1 लाख 44 हजार 507 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण - रिकव्हरी रेट 55.38 टक्के इतका आहे.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a5%ac

^