Menu

नवी दिल्ली : आधार कार्ड हरवल्यास असं डाऊनलोड करा e- Aadhaar

आधार कार्डची मूळ प्रत हरवल्यास त्याऐवजी e- Aadhaar कार्डचा वापर केला जाऊ शकतो. आधार अधिनियमनुसार,  e- Aadhaarची कॉपी कामकाजावेळी दाखवली जाऊ शकते. जर एखाद्या कारणामुळे इनरोलमेंटनंतर आधार कार्ड पोहचण्यास वेळ लागत असेल किंवा आधारची मूळ प्रत हरवली तर ई-आधार डाऊनलोड करुन प्रिंट काढता येऊ शकते.
%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1-%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%b5

e- Aadhaar डाऊनलोड करण्यासाठी –

– https://uidai.gov.in/ वर ‘माय आधार’ सेक्शनमध्ये डाऊनलोड आधारवर क्लिक करा.
– त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल  https://eaadhaar.uidai.gov.in/#/
– या लिंकवर आधार क्रमांक, इनरोलमेंट आयडी किंवा व्हर्चुअल आयडी भरावा लागेल.
– त्यानंतर आवश्यक ते डिटेल्स नाव, पिन कोड, सिक्योरिटी कोड भरावा लागेल.
– जर मास्क्ड आधार हवं असेल तर तो पर्याय निवडावा लागेल.
– त्यानंतर OTP रिक्वेस्ट पाठवली जाईल.  OTP त्याच नंबरवर येईल, जो मोबाईल क्रमांक आधार कार्ड बनवताना रजिस्टर केला असेल.
– OTP टाकल्यानंतर ‘व्हेरिफाय अँड डाऊनलोड’वर क्लिक करा.
– त्यानंतर आधार कार्डची ई-कॉपी डाऊनलोड होईल.

^