Menu

दिल्ली : आंतरराष्ट्रीय अवकाश तळ आज भारतातल्या काही शहरांमध्ये घडणार दर्शन

आंतरराष्ट्रीय अवकाश तळाबद्दल आपण ऐकून आहोत. अवकाशाशी संबंधित विविध रहस्ये जाणून घेण्यासाठी, या तळावर वैज्ञानिक नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. पण तुम्हाला हे माहित आहे का? पृथ्वीवरुन सुद्धा तुम्ही अगदी सहजपणे हा आंतरराष्ट्रीय अवकाश तळ पाहू शकता. सूर्य आणि चंद्रानंतर आंतरराष्ट्रीय अवकाश तळ हा आकाशातील तिसरा प्रकाशमान ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे पृथ्वीरुन तुम्ही सहजतेने हा अवकाश तळ पाहू शकता.
%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%85%e0%a4%b5

फक्त स्वच्छ आकाश आणि वेळ या दोन गोष्टी जुळून आल्यात तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय अवकाश तळाचे दर्शन घडू शकते. आज भारतातील काही शहरातूनही हा आंतरराष्ट्रीय अवकाश तळ पाहता येणार आहे. गुजरातमधील राजकोट, अहमदाबाद, राजस्थानातील जयपूर आणि दिल्ली या शहरातून आज हा अवकाश तळ पाहता येईल. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. ISS चे अवकाशात भ्रमण सुरु असते. आज भारतातील काही शहरांरुन हे स्पेस स्टेशन जाणार आहे. अहमदाबाद, राजकोटमध्ये रात्री ८.३५ च्या सुमारास तर जयपूर, दिल्लीमध्ये ८.३७ च्या सुमारास हे स्पेस स्टेशन पाहता येईल. अहमदाबाद, राजकोट, जयपूर, दिल्ली या चार शहरांमध्ये सहा मिनिटांसाठी हे स्पेस स्टेशन दिसणार आहे. स्पेस स्टेशन हे आकाशातील तिसरे प्रकाशमान ऑब्जेक्ट आहे. एखादा तारा कसा दिसतो, तशा स्वरुपात तुमच्या डोळयांना हे स्पेस स्टेशन दिसेल. पण ताऱ्यांच्या तुलनेत ISS खूप प्रकाशमान दिसेल. विमानासारखे या स्पेस स्टेशनचे उड्डाण असेल पण वेग प्रचंड असेल. वरती उल्लेख केलेल्या शहरांमध्ये तुम्ही असाल तर, प्रकाशमान ताऱ्यासारखी वस्तू आकाशात उड्डाण करताना तुम्ही पाहू शकता.

^