Menu

जयपूर : बंधक बनवल्यासारखी स्थिती, गाडीच्या चाव्या काढून घेतल्या, राजस्थानात आमदाराचा गंभीर आरोप

राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील राजकीय लढाई टीपेला पोहोचली आहे. दरम्यान राजस्थानात वेगाने राजकीय घडामोडी घडत असताना भारतीय ट्रायबल पार्टीचे आमदार राजकुमार रौत यांनी सरकारवर खूप गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला जबरदस्तीने थांबवण्यात येत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. राजकुमार रौत यांनी स्वत:चा एक व्हिडीओ बनवून पाठवला आहे. “मी गेल्या तीन दिवसांपासून आमदार निवासामध्ये होतो. आज मी माझ्या मतदारसंघात जाण्यासाठी निघालो, तेव्हा पोलिसांच्या तीन-चार गाडया माझ्या गाडीच्या पुढे-मागे होत्या. एकप्रकारे मला कैद करुन ठेवण्यात आले आहे. पोलीस मला कुठलीही हालचाल करु देत नाहीयत. पोलिसांनी माझ्या गाडीच्या चाव्या काढून घेतल्या आहेत. एका आमदाराला खूप वाईट वागणूक दिली जात आहे” असे त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. राजकुमार रौत हे चौरासी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%95-%e0%a4%ac%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%96%e0%a5%80

^