Menu

मुंबई : दूध भुकटी आदिवासी मुले, महिलांना मोफत देणार – उद्धव ठाकरे

दूध भुकटी ही पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील ६ लाख ५१ हजार मुलांना आणि १ लाख २१ हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय बुधावारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%a6%e0%a5%82%e0%a4%a7-%e0%a4%ad%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%ae

या बैठकीस दुग्धविकास मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, त्याचप्रमाणे राज्यमंत्री बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, दुग्धविकास प्रधान सचिव अनुप कुमार, महिला व बालकल्याण सचिव आय. ए. कुंदन, आदिवासी विकास सचिव विनिता सिंघल, महानंदचे प्रतिनिधी हे देखील उपस्थित होते. ही योजना पुढे एक वर्ष राबविण्यात येणार असून १२१ कोटी उत्पादन खर्च आला आहे. भुकटीचा प्रती किलो उत्पादन खर्च २४६ रुपये ७० पैसे इतका आहे. दूध भुकटीत प्रोटीनचे प्रमाण ३४ टक्के आहे आणि या कोविड काळात पोषणासाठी ती उपयुक्त असल्याने मुलांना, स्तनदा व गरोदर मातांना त्याचा अधिक लाभ होईल यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

^