Menu

मुंबई : प्रसिद्ध लेखिका आणि चित्रपट निर्माती सादिया देहलवी यांचे निधन

देशातील नामांकित लेखिका, स्तंभलेखक, चित्रपट निर्माती सादिया देहलवी (Sadia Dehlvi) यांचे मेटास्टॅटिक स्तनाच्या कर्करोगाशी (metastatic breast cancer) दोन वर्ष चाललेल्या लढाईनंतर ५ ऑगस्ट २०२० रोजी निधन झाले. देहलवी यांना नुकतेच दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. सादिया यांच्या निधनानंतर समाजमाध्यमांवर अनेक चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3

सादिया देहलवी यांचा जन्म १९५७, दिल्ली येथे झाला होता. ती मनाची एक सूफी महिला होती, तिच्या कविता आणि लेखांत इस्लामच्या कट्टपरंथी भाषणावर टीका केलेली असायची. सुफीवादावर त्यांचे पहिले पुस्तक ‘सुफीझ्म : द हार्ट ऑफ इस्लाम’ हे त्यांचे पहिले पुस्तक २००९मध्ये हार्पर कोलिन्स इंडियाने प्रकाशित केले होते. ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या अन्य लोकप्रिय पुस्तकांमध्ये ‘द सूफी कोर्टयार्ड: दिल्ली की दरगाह’ (२०१२) आणि ‘जस्मीन अँड कमोडिटीज: मेमरी अ‍ॅन्ड रेसिपी ऑफ मेरी दिल्ली’ (२०१)) यांचा समावेश आहे.

^