Menu

मुंबई : राज्यात १०,३०९ नवे कोरोना रुग्ण; आतापर्यंत दिवसभरातील सर्वाधिक ३३४ बळी

आज राज्यात 10 हजार 309 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात आज एका दिवसात सर्वाधिक 334 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची काहीशी दिलासादायक बाब आहे. आज दिवसभरात 6165 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 68 हजार 265 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 3 लाख 5 हजार 521 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 65.25 टक्के इतकं आहे.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a5%a7%e0%a5%a6%e0%a5%a9%e0%a5%a6%e0%a5%af-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%87-%e0%a4%95

^