Menu

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासात 56,282 रुग्णांची वाढ

भारतात कोरोनाचा कहर सुरुच आहे. देशात कोरोनामुळे मृत्यूची संख्या आता 40 हजारांच्या पुढे गेली आहे. तर, गेल्या कित्येक दिवसांपासून दररोज सरासरी 50 हजाराहून अधिक रुग्ण वाढत आहेत. भारतातील एकूण रुग्णांची संख्या 20 लाखांपर्यंत पोहोचली आहे. सर्वाधिक कोरोना बाधित देशांच्या यादीत अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारताचा क्रमांक लागतो.
%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-24

गेल्या 24 तासांत देशात एकूण 56,282 रुग्ण आढळले आहेत तर एकूण 904 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या 19.64 लाखांवर गेली असून त्यापैकी 5.95 लाख रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 13.28 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत एकूण 904 लोकांचा बळी गेला असून मृतांचा आकडा 40,699 वर पोहचला आहे.

भारतात रिकव्हरी रेट 67 टक्क्यावर गेला आहे. तर मृत्यू दर 2.07 टक्के झाला आहे. गेल्या 24 तासांत जगातील सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. येथे सुमारे १२२२ लोकांनी प्राण गमावले आहेत. तर 53,633 नवे रुग्ण वाढले आहेत. गेल्या 3 आठवड्यांपासून अमेरिकेत सरासरी सरासरी 50 हजारांहून अधिक रुग्ण वाढत आहेत. अमेरिकेत एकूण रुग्णांची संख्या 48 लाखांवर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1.58 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचं थैमान सुरुच आहे. येथे गेल्या 24 तासांत येथे सुमारे 57152 रुग्ण वाढले असून एकूण रुग्णांची संख्या 28.59 लाखांवर पोहोचली आहे. तर 1437 मृत्यूची नोंद झाली असून, एकूण मृतांची संख्या 97 हजारांवर गेली आहे.

^