Menu

मुंबई : आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याची आत्महत्या

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येतून सर्वजण सावरत नाहीत, तोच आता आणखाी एका लोकप्रिय अभिनेत्यानं आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. अभिनेता समीर शर्मा यानं त्याच्या मुंबईतील मालाड परिसरात असणाऱ्या राहत्या घरामध्या आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%96%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af-%e0%a4%85

‘ये रिश्ते है प्यार के’, ‘सास भी कभी बहु थी’, ‘कहानी घर घर की’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांतून समीर झळकला होता. दोन दिवसांपूर्वीच त्यानं ही आत्महत्या केली असून, त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती कळत आहे. दरम्यान, समीरची आत्महत्या आता कलाविश्वाला आणखी एक हादरा देऊन गेली आहे. त्याच्या घरातून अद्यापही कोणत्याही प्रकारचा पुरावा किंवा चिठ्ठी सापडलेली नाही. समीर मुंबईतील मालाड येथील घरी एकटाच राहात होता. पत्नीचा त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही, त्यावेळी काहीतरी चुकीचं घडलं असल्याची शंका तिला आली. शिवाय समीर काही दिवस कोणालाच दिसलाही नाही. त्याचवेळी चौकीदाराला मृतदेहाचा वास येण्यास सुरु होताच त्यानं पोलिसांना माहिती दिली. ज्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत घराचं दार उघडलं असता समीरचा मृतदेहच पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. सध्याच्या घडीला या घटनेनं अनेकांना हादला बसला असून, समीरच्या आत्महत्येचं मूळ कारण मात्र अस्पष्टच आहे.

^