Menu

अबु धाबी : मुंबईने विजयाचं खातं उघडलं, कोलकात्याला धूळ चारली

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबईने विजयाचं खातं उघडलं आहे. कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ४९ रननी दणदणीत विजय झाला आहे. मुंबईने ठेवलेल्या १९६ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याला २० ओव्हरमध्ये १४६/९ एवढाच स्कोअर करता आला.
%e0%a4%85%e0%a4%ac%e0%a5%81-%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%82

मुंबईच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली. स्कोअरबोर्डवर २५ रन असतानाच कोलकात्याचे दोन्ही ओपनर माघारी परतले होते. यानंतर दिनेश कार्तिक आणि नितीश राणाने कोलकात्याचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना मोठी मजल मारता आली नाही. कार्तिक आणि नितीश आऊट झाल्यानंतर मुंबईच्या बॉलरनी कोलकात्याला वारंवार धक्के दिले. कोलकात्याकडून आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या पॅट कमिन्सने १२ बॉलमध्ये सर्वाधिक ३३ रन केले. बुमराहच्या एका ओव्हरमध्ये कमिन्सने ४ सिक्स मारले. मुंबईकडून बोल्ट, पॅटिनसन, बुमराह आणि चहरला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. तर कायरन पोलार्डला १ विकेट घेण्यात यश आलं. या मॅचमध्ये कोलकात्याने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला.

^