Menu

नवी दिल्ली : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५७ लाखांवर; गेल्या २४ तासात ८६,५०८ नवे रुग्ण

भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. रुग्णांचा सतत वाढणारा आकडा भारताची चिंता वाढवणारा आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 57 लाखांवर पोहचली आहे. गेल्या 24 तासात देशात 86 हजार 508 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 1129 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%be-14

देशात आतापर्यंत 57 लाख 32 हजार 519 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 46 लाख 74 हजार 988 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर सध्या भारतात 9 लाख 66 हजार 382 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनामुळे 91 हजार 149 जणांचा मृत्यू झाला आहे. 23 सप्टेंबर 2020 पर्यंत देशात 6,74,36,031 जणांचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. बुधवारी एका दिवसात 11,56,569 चाचण्या करण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) दिली आहे.  देशात कोरोना रुग्ण वाढत असतानाच कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेने जास्त असल्याने ही एक दिलासादायक बाब आहे. पण, त्यातही रुग्णवाढीचा वेग मात्र मंदावण्याचं नाव घेत नाही आहे. त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढे आव्हानाची परिस्थिती उभी राहत आहे.

^