Menu

मुंबई : कंगना रानौतचे ट्विट, भिवंडीत पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले

कंगना रानौत हिने आणखी एक खळबळजनक ट्विट केले आहे. माझे घर तोडण्याऐवजी भिवंडीतल्या इमारतीवर वेळीच लक्ष दिले असते तर एवढे लोक मारले गेले नसते, अशी टीका कंगनाने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळेच पुलवामापेक्षाही अधिक लोक मारले गेल्याचा आरोप तिने केला आहे. त्यामुळे शिवसेना आता आपली काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागले आहे.
%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8c%e0%a4%a4%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%bf

अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रानौत हिच्या कार्यालय बांधकामावर हातोडा चालविला. मात्र, मुंबई पालिकेच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच महापालिकेचे वॉर्ड अधिकारी आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची  कंगना रानौत हिची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली आहे. तसेच २५ सप्टेंबरपर्यंत कंगनाच्या कार्यालयामधील तोडफोडीला स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, कंगनाने बांधकाम पाडल्याप्रकरणी मुंबई पालिकेने दोन कोटींची भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी ती न्यायालयात गेली आहे.

^